If you're seeing this message, it means we're having trouble loading external resources on our website.

तुम्ही जर वेब-फिल्टरच्या मागे असाल तर खात्री करा की डोमेन *.kastatic.org आणि *.kasandbox.org अनब्लॉक्ड आहे.

मुख्य साहित्य

पुनरावलोकन

पुनरावलोकन

खान अकॅडमी का वापरावी?

गणित शिकवताना शिक्षकांसमोर येणारी आव्हाने.

आव्हान 1 - विद्यार्थ्यांसोबत शेअर करण्यासाठी सर्वसमावेशक आणि विश्वासार्ह संसाधनांचा अभाव.

  • पहिल्या आव्हानाच्या समाधानाने सुरुवात करूया. आम्ही खान अकादमीमध्ये अभ्यासक्रमाच्या मानकांशी संरेखित सामग्री प्रदान करतो.
  • एका वेळी एका कौशल्यावर लक्ष केंद्रित करून आम्ही तुमच्यासाठी प्रत्येक कौशल्याची चाचणी घेण्यासाठी विविध प्रकारचे सराव आणतो. आणि हे सराव अनेक वेळा केले जाऊ शकतात.
  • आमचे प्लॅटफॉर्म संदर्भासाठी सूचना आणि व्हिडिओंद्वारे प्रोत्साहन आणि समर्थनासाठी त्वरित अभिप्राय देते.

आव्हान 2 - विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा मागोवा घेण्यात अडचण

  • खान अकादमी विद्यार्थ्यांच्या प्रगतीबाबत स्पष्ट तपशीलवार रिपोर्ट देऊन हे आव्हान सोडवण्यास मदत करते. हे शिक्षकांना विद्यार्थ्यांची कामगिरी ओळखण्यास आणि त्यांचे कौतुक करण्यास मदत करते. रिपोर्ट अनुसार, प्रत्येक विद्यार्थ्याला कोणत्या स्तरावर नियुक्त करायचे हे शिक्षक ठरवू शकतात.

आव्हान 3 - विविध स्तरावरील विद्यार्थ्यांना मदत करणे

  • विद्यार्थ्याची शिकण्याची पातळी ओळखूनही, शिक्षकाला त्यांच्यापैकी प्रत्येकाची पूर्तता करणे कठीण जाऊ शकते.
  • खान अकादमी विद्यार्थ्यांचे शिक्षण वैयक्तिकृत करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे.
  • विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या पातळीनुसार शिक्षक सामग्री नियुक्त करू शकतात. जसे दोन विद्यार्थ्यांना दोन भिन्न संकल्पनांमध्ये अडचण येत असेल, तर शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्याला वेगवेगळे सराव नियुक्त करू शकतात.

खान अकादमीवर उपलब्ध असलेले अभ्यासक्रम/सामग्री

खान अकादमी हे एक मास्टरी-आधारित प्लॅटफॉर्म आहे ज्यामध्ये सामग्री तुमच्या राज्य अभ्यासक्रमाशी मॅप केलेली आहे.
  • आम्‍ही इंग्रजी आणि पंजाबी, मराठी आणि हिंदीसह अनेक भारतीय भाषांमधील सामग्रीसह KG ते 12 वी इयत्तेसाठी गणित आणि विज्ञानावर लक्ष केंद्रित करतो.
  • तुमच्या पुस्तकातील अध्यायांप्रमाणेच वर्ग वेगवेगळ्या युनिटमध्ये विभागलेला आहे. प्रत्येक युनिटसाठी तुम्ही वेगवेगळे धडे पाहू शकता. प्रत्येक धड्यात व्हिडिओ, सराव आणि प्रश्नमंजुषा असतात. प्रत्येक युनिटच्या शेवटी एक युनिट चाचणी असते.
  • कोर्स मास्टरी पॉइंट्सने सुरू होतो आणि कोर्स आव्हानाने संपतो.
आम्‍हाला आशा आहे की तुम्ही सुचवलेले उपक्रम वापरून पहाल. तुमचा अभिप्राय इथे शेअर करा.

संवादात सामील व्ह्यायचे आहे का?

अद्याप कोणत्याही पोस्ट नाहीत.
तुम्हाला इंग्रजी समजते का? अधिक चर्चा पाहण्याकरता खान अकॅडमीच्या इंग्रजी साइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.