सर्व शिक्षकांचे स्वागत! खान अकॅडमी वरील तुमचा प्रवास सुरू करण्यासाठी शिक्षकांसाठी खान चा हा कोर्स तुम्हाला मदत करेल. पहिल्या युनिटमध्ये (बिगिनर कोर्स) अशा शिक्षकांसाठी शैक्षणिक माहिती आहे ज्यांना खान अकॅडमी वापरण्याचा पूर्व अनुभव नाही व ते प्रथमच याचा वापर करणार आहेत.
दुसऱ्या युनिटमध्ये शिक्षकांसाठी खान चा बिगिनर अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या किंवा खान अकॅडमि वापरण्याचा पूर्वीचा अनुभव असलेल्या शिक्षकांसाठी प्रगत अभ्यासक्रम आहे.
या प्रत्येक युनिट/कोर्ससाठी प्रमाणपत्र स्वतंत्रपणे उपलब्ध आहे. पूर्णत्व प्रमाणपत्र मिळविण्यासाठी, तुम्हाला संबंधित युनिट/कोर्समध्ये 50%+ मास्टरी स्कोर मिळायला हवा.
कृपया तुमची कोर्स मधील प्रगती सेव्ह करण्यासाठी खान अकॅडमिमध्ये लॉग इन करा व नंतर कोर्स मधील अभ्यासक्रमास सुरुवात करा.