तुम्ही जर हा संदेश पाहत असाल तर त्याचे कारण हे की आम्हाला बहिस्थ संसाधने लोडींग करण्यात व्यतयय येत आहे.

If you're behind a web filter, please make sure that the domains *.kastatic.org and *.kasandbox.org are unblocked.

मुख्य साहित्य

पुनरावलोकन

पुनरावलोकन

विद्यार्थ्यांना शैक्षणिक माहिती नियुक्त करणे

विद्यार्थ्यांना शैक्षणिक माहिती नियुक्त करणे

तुम्ही असाइनमेंट का नियुक्त करावी? शैक्षणिक माहिती का नियुक्त करण्‍याची आवश्‍यकता आहे असा तुम्‍हाला प्रश्‍न वाटत असल्‍यास, खालील काळजीपूर्वक वाचा.
 • तुम्ही विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी घेऊ शकता.
 • तुमचे विद्यार्थी कोणत्या क्षेत्रात चांगले काम करत आहेत आणि त्यांना अतिरिक्त सराव कुठे आवश्यक आहे हे तुम्हाला माहीत आहे.
 • जे विद्यार्थी पुढील विषयाकडे जाण्यास तयार आहेत आणि ज्यांना तुमच्याकडून अतिरिक्त समर्थनाची गरज आहे अशा विद्यार्थ्यांचे गुण आणि नावे तुम्ही विद्यार्थ्यांना शैक्षणिक माहिती नियुक्त करत असताना पाहू शकता.
शैक्षणिक माहिती कशी नियुक्त करावी?
 • शैक्षणिक माहिती नियुक्त करण्यासाठी, शिक्षक डॅशबोर्डमधून वर्ग निवडा, डावीकडील असाइनमेंट टॅबवर क्लिक करा, शैक्षणिक माहिती निवडा आणि उजवीकडील बॉक्सवर क्लिक करा आणि नंतर ठरवा वर क्लिक करा
 • प्रत्येक शैक्षणिक माहिती नियुक्त करण्यापूर्वी तुम्ही त्याचे पूर्वावलोकन करावे अशी शिफारस केली जाते.
 • असाइन टॅबच्या बाजूला असलेल्या ब्रॅकेटमधील संख्या निवडलेल्या असाइनमेंटची संख्या दर्शवते.
 • एकदा तुम्ही ठरवा वर क्लिक केल्यानंतर, तुम्ही विद्यार्थ्यांना शैक्षणिक माहिती नियुक्त करण्यासाठी निवडू शकता, समान किंवा भिन्न शैक्षणिक माहिती नियुक्त करू शकता, विद्यार्थ्यांनी असाइनमेंट पूर्ण करण्‍याची अंतिम तारीख आणि वेळ निवडू शकता.
 • असाइनमेंटच्या खाली दिलेला संख्या टॅब विद्यार्थ्यांची प्रगती आणि स्कोअर पाहतो.
 • संख्या टॅब खालील व्यवस्थापित करा टॅब शिक्षकांना असाइनमेंट संपादित/हटवण्यास आणि देय तारीख बदलण्यास मदत करते.
 • शिक्षक जेव्हा कोर्सचे मास्टरी/ अभ्यासक्रम प्रभुत्व ध्येय तयार करतात तेव्हा ते संपूर्ण शैक्षणिक माहिती देखील नियुक्त करू शकतात.

विद्यार्थ्याचा अनुभव

आम्ही म्हटल्याप्रमाणे विद्यार्थी असाइनमेंट कसे पाहू शकतात आणि त्यावर कार्य करू शकतात हे समजून घेण्यासाठी तुम्हाला प्रत्यक्ष अनुभव मिळवणे आवश्यक आहे. हे शिक्षकांना असाइनमेंटशी संबंधित सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यास मदत करेल.
 • एकदा विद्यार्थ्यांनी लॉग इन केल्यावर, त्यांना ते सामील झालेले वर्ग आणि त्यांनी निवडलेले अभ्यासक्रम पाहतील. 'माझे खाते’ अंतर्गत, ते त्यांची प्रगती, प्रोफाइल आणि शिक्षकांची माहिती पाहू शकतात.
 • विद्यार्थी डावीकडील मेनूमध्ये असाइनमेंट पाहू शकतो. ते प्रत्येक असाइनमेंटच्या देय तारखेच्या क्रमाने असेल. ते त्यांची प्रभुत्व पातळी देखील पाहू शकतात.
 • विद्यार्थी असाइनमेंटवर काम करत असताना त्यांना त्वरित अभिप्राय मिळतो. मदतीसाठी सूचना आणि संबंधित व्हिडिओ उपलब्ध आहेत.
 • विद्यार्थी "पुन्हा प्रयत्न करा" चिन्हावर क्लिक करून त्यांच्या चुकांमधून शिकत असताना ते अनेक वेळा प्रयत्न करू शकतात.
 • 100% गुणांसह सराव पूर्ण केल्यावर त्यांना ‘अप नेक्स्ट’ पर्याय आणि ‘नेक्स्ट असाइनमेंट’ दिसेल. अप नेक्स्ट ऑप्शन हा कोर्स मॅस्ट्रीसाठी आहे आणि नेक्स्ट असाइनमेंट त्यांना नेमलेल्या पुढील असाइनमेंटसाठी आहे.
 • स्मार्टफोन वापरकर्ते ‘कंटिन्यू’ बटणावर क्लिक करून व्यायामाच्या शेवटी तेच पर्याय शोधू शकतात.
 • विद्यार्थी कोणत्याही डिव्हाइसवरून आणि कुठूनही असाइनमेंट पूर्ण करू शकतात, मग ते घरी असो किंवा वर्गात.
 • विद्यार्थ्याला अभ्यासक्रमाच्या तीन स्तरांवर त्यांच्या कामगिरीबद्दल अभिप्राय मिळतो.
प्रयत्न केला - जेथे विद्यार्थ्याचे 70% पेक्षा कमी योग्य प्रतिसाद आहेत
परिचित - जेथे विद्यार्थ्याचे 70% किंवा अधिक योग्य प्रतिसाद आहेत
प्रवीण - जेथे विद्यार्थ्याने 100% गुण मिळवले आहेत
 • शिकणारा गृह वरील प्रगती टॅब अंतर्गत, विद्यार्थी त्यांची स्वतःची प्रगती आणि त्यांनी व्यासपीठावर घालवलेला वेळ पाहू शकतात.
 • प्रोफाइल टॅब अंतर्गत, ते व्यासपीठावर शिकण्यात वेळ घालवल्यानंतर, व्हिडिओ पाहण्यात आणि सराव (लॅपटॉप आणि मोबाइल स्क्रीन) पूर्ण केल्यानंतर त्यांनी कमावलेले बॅज, अवतार आणि ऊर्जा गुण पाहू शकतात.
येथे क्लिक करून आम्हाला तुमचा आतापर्यंतचा अनुभव सांगा.

संवादात सामील व्ह्यायचे आहे का?

तुम्हाला इंग्रजी समजते का? अधिक चर्चा पाहण्याकरता खान अकॅडमीच्या इंग्रजी साइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.