If you're seeing this message, it means we're having trouble loading external resources on our website.

तुम्ही जर वेब-फिल्टरच्या मागे असाल तर खात्री करा की डोमेन *.kastatic.org आणि *.kasandbox.org अनब्लॉक्ड आहे.

मुख्य साहित्य

पुनरावलोकन

खान अकॅडमी इम्प्लिमेंटेशन मॉडेल

खान अकॅडमी इम्प्लिमेंटेशन मॉडेल

खान अकॅडमीचा वापर करण्यासाठी आवश्यक मूलभूत संसाधने

 1. खान अकॅडमी लागू करण्यासाठी दोन मूलभूत संसाधने आवश्यक आहेत.
अ. कोणत्याही प्रकारचे उपकरण जो कि स्मार्ट फोन, लॅपटॉप, डेस्कटॉप किंवा टॅब्लेट असू शकतो.
ब. इंटरनेट कनेक्टिव्हिटी जेणेकरून विद्यार्थी व्हिडिओ पाहू शकतील आणि सराव सोडवू शकतील.
 1. इतर सूचना:
अ. खान अकॅडमीचा उपयोग करण्यासाठी गुगल क्रोम सर्वात उत्तम ब्राउझर आहे.
ब. विद्यार्थी खान अकॅडमीचा उपयोग आमच्या मोबाइल ॲपवर सुद्धा करू शकतात. जे कि अँड्रॉइड आणि ॲपल या दोन्ही स्मार्टफोनसाठी उपलब्ध आहे.
क. मात्र, सध्या शिक्षकांना खान अकॅडमीचा उपयोग केवळ वेब ब्राऊझरवर करता येईल, मोबाइल ॲपवर नाही.
ड. खान अकॅडमीचे व्हिडिओ यूट्यूबद्वारे होस्ट केले जातात. त्यामुळे खान अकॅडमी योग्यरीत्या सुरु करण्यासाठी यूट्यूब अनब्लॉक करणं गरजेचं आहे.

वर्गात खान अकॅडमी असाइनमेंट वापरण्याचे वेगवेगळे मार्ग

मॉडेल 1: शिकवा, नियुक्त करा आणि सराव करा

हे मॉडेल काय आहे?

 • तुम्ही तुमच्या योजनेनुसार/अभ्यासक्रमानुसार संकल्पना शिकवू शकता. तुमच्या शाळेतील पायाभूत सुविधांच्या उपलब्धतेच्या आधारावर, तुम्ही हि संकल्पना शिकवण्यासाठी खान अकॅडमीवर उपलब्ध व्हिडिओ वापरू शकता किंवा तुम्ही सामान्यपणे शिकवता त्या पद्धतीने शिकवू शकता.
 • तुम्ही विद्यार्थ्यांना संकल्पना सादर केल्यानंतर, शिकवलेल्या संकल्पनेशी संबंधित एक विशिष्ट स्वाध्याय खान अकॅडमीवर विद्यार्थ्यांना नियुक्त करू शकता.
 • विद्यार्थी वर्गामध्येच खान अकॅडमीच्या स्वाध्याय चा सराव करतील.

शिक्षकांना मदत करण्यासाठी आपण काय करू शकता?

 • आपल्या कोणत्या शिक्षकांनी हे मॉडेल निवडले आहे याची माहिती घेणे.
 • शिक्षकांना वर्गातील सर्व विद्यार्थ्यांसाठी उपकरणे आणि इंटरनेट कॅनेक्टिव्हिटी उपलब्ध झाली आहे की नाही हे तपासणे.
 • खान अकॅडमी तासिकेसाठी शिक्षकांना शाळेची संगणक प्रयोगशाळा उपलब्ध करून देण्यासाठी आपण संगणक शिक्षक आणि शाळेच्या मुख्याध्यापकांशी समन्वय साधू शकता.
 • शाळेच्या वेळापत्रकात दर आठवड्याला कमीतकमी 2 खान अकॅडमीच्या तासिका आहेत कि नाही याची खात्री करा.

मॉडेल 2: गृहपाठ असाइनमेंटसाठी खान अकॅडमी वापरा

हे मॉडेल काय आहे?

 • तुम्ही वर्गात एखादा विषय शिकवू शकता आणि पाठ्यपुस्तकांतील प्रश्नांचा सराव तुम्ही सामान्यपणे करू शकता.
 • त्यानंतर खान अकॅडमीची सामग्री विद्यार्थ्यांना गृहपाठ असाइनमेंट म्हणून द्या. विद्यार्थी वर्गात येण्यापूर्वी घरी असाइनमेंट पूर्ण करू शकतात आणि सरावात प्रभुत्व मिळवू शकतात.
 • त्यानंतर तुम्ही विद्यार्थ्यांच्या गुणांचे पुनरावलोकन करू शकता आणि विद्यार्थ्यांना अधिक समर्थनाची आवश्यकता असलेले कौशल्य/विषय निवडू शकता. त्यानंतर तुम्ही तुमच्या पुढील वर्गात पुन्हा शिकवू शकता किंवा शंकांचे स्पष्टीकरण देऊ शकता.

शिक्षकांना मदत करण्यासाठी आपण काय करू शकता?

 • पालकांशी संपर्क साधण्यासाठी आपण आपल्या शिक्षकांना मदत करू शकता.
 • शिक्षक पालक सभेचे आयोजन करून आपण त्यांना मदत करू शकता आणि शक्य असल्यास या बैठकी मध्ये आपण पालकांना संबोधित देखील करू शकता.
 • ज्या विद्यार्थ्यांच्या घरी उपकरणे उपलब्ध नाहीत, त्यांना शाळेत उपकरणे उपलब्ध करून द्या.
 • अशा विद्यार्थ्यांना शोधण्यासाठी आपल्या शिक्षकांसोबत काम करा आणि नंतर या विद्यार्थ्यांना शाळेत अतिरिक्त मदत मिळेल याची खात्री करा.

मॉडेल 3: परीक्षेपूर्वी उजळणीसाठी खान अकॅडमी वापरा

हे मॉडेल काय आहे?

 • विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार तुम्ही सामग्री नियुक्त करू शकता.
 • त्यानंतर तुम्ही आठवड्यातून एक दिवस विद्यार्थ्याने त्यांना नेमून दिलेल्या विषयांवर काम करण्यासाठी त्यांच्या समजातील अंतर भरून काढावे.
 • त्याचप्रमाणे उजळणीसाठी, तुम्ही नवीन आणि जुनी कौशल्ये किंवा सराव यांचे मिश्रण नियुक्त करू शकता जेणेकरून विद्यार्थी सतत जुन्या विषयांचे पुनरावलोकन करत असतील आणि नवीन शिकत असतील.
 • दरम्यान तुम्हाला प्लॅटफॉर्मवर नियमित प्रगती रिपोर्ट प्राप्त होतील.

शिक्षकांना मदत करण्यासाठी आपण काय करू शकता?

 • एक शिक्षक मार्गदर्शक या नात्याने सरावात सातत्य असणे किती गरजेचे आहे, याची जाणीव आपल्याला आहे. या सोबतच आपणास खान अकॅडमी प्लॅटफॉर्ममध्ये विद्यार्थ्यांच्या उजळणीसाठी अत्यंत उपयुक्त साधन म्हणून असलेल्या प्रचंड क्षमतेबद्दल देखील आपल्याला माहिती आहे.
खान अकॅडमी लागू करण्यात तुमचा आतापर्यंतचा अनुभव कसा आहे ते जरूर सांगा. आपले अनुभव शेअर करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा.