If you're seeing this message, it means we're having trouble loading external resources on our website.

तुम्ही जर वेब-फिल्टरच्या मागे असाल तर खात्री करा की डोमेन *.kastatic.org आणि *.kasandbox.org अनब्लॉक्ड आहे.

मुख्य साहित्य

खान अकॅडमी - इम्प्लिमेंटेशन मॉडेल्स

खान अकॅडमी - इम्प्लिमेंटेशन मॉडेल्स

खान अकॅडमी - इम्प्लिमेंटेशन मॉडेल्स

या लेखात आम्ही तुमच्या विद्यार्थ्यांसोबत खान अकॅडमी वापरण्यासाठी काही मॉडेल्सचा उल्लेख केला आहे. कृपया लक्षात घ्या की ही काही मॉडेल्स आहेत जी जगभरात वापरली जात आहेत. तुम्ही, एक शिक्षक म्हणून, तुमच्या वर्गासाठी काय सर्वोत्तम आहे हे ठरवू शकता व यातील तुम्हाला योग्य वाटणाऱ्या मॉडेल ची निवड करू शकता

मॉडेल 1- शिकवा, नियुक्त करा आणि सराव करा

या मॉडेलमध्ये, शाळेतील विद्यार्थ्यांची वैचारिक समज आणि सराव मजबूत करण्यासाठी शिक्षक खान अकॅडमीचा नियमित सराव साधन म्हणून वापर करतात. या मॉडेलसाठी विद्यार्थ्यांना वर्गादरम्यान उपकरणांची उपलब्धता असणे आवश्यक आहे.
तुम्ही वर्गात याची अंमलबजावणी कशी करू शकता ते खाली दिले आहे.

वर्गापुर्वी

तुम्ही संबंधित शैक्षणिक साहित्य शोध ण्यासाठी 5-10 मिनिटे घेऊ शकता, त्यानंतर तुमच्या संपूर्ण वर्गाला संबंधित लेख, व्हिडिओ आणि सराव नियुक्त करू शकता. आम्ही शिफारस करतो की तुम्ही सामग्री अशा प्रकारे नियुक्त करा की विद्यार्थ्यांनी खान अकॅडमीवर आठवड्यातून किमान 30 मिनिटे सराव करावा कारण आम्ही पाहिले आहे की त्याचा विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर लक्षणीय परिणाम होतो.

वर्गादरम्यान

नवीन संकल्पनेचा परिचय: तुम्ही एकतर नवीन संकल्पना स्वतः शिकवू शकता/परिचय देऊ शकता किंवा खान अकॅडमीचे व्हिडिओ संपूर्ण वर्गासोबत शेअर करून आणि चर्चा करून नवीन संकल्पना मांडणे तुम्हाला उपयुक्त वाटू शकते.
मार्गदर्शित आणि स्वतंत्र सराव: विद्यार्थी नंतर शिकवलेल्या विषयावर आधारित त्यांना नियुक्त केलेल्या प्रश्नमंजुषेचा सराव करतात. बहुतेक विद्यार्थी 1 अनिवार्य सराव पूर्ण करतात. काही विद्यार्थी 2रा सराव पूर्ण करतात. जर विद्यार्थी पहिल्या सरावात अडकले तर ते सूचना/हिंट्स पाहू शकतात किंवा संकल्पनेचे पुनरावलोकन करण्यासाठी व्हिडिओ पाहू शकतात.
यानंतर, तुमच्या लक्षात येईल की उदाहरणार्थ 20 पैकी फक्त 7 विद्यार्थ्यांनी एका समस्येचे अचूक उत्तर दिले आहे. वर्ग त्या अवघड प्रश्नावर चर्चा करू शकतो.

वर्गा नंतर

इतर कोणतेही ट्रेंड वेगळे आहेत का हे पाहण्यासाठी तुम्ही रिपोर्ट पुन्हा एकदा पहा. जर तुमच्या विद्यार्थ्यांनी 70% किंवा त्याहून अधिक गुण मिळवले, तर तुम्ही पुढील वर्गात सराव करण्यासाठी नवीन संकल्पनेकडे जाण्याचा निर्णय घेऊ शकता.
जर तुमच्या विद्यार्थ्यांनी 70% पेक्षा कमी गुण मिळवले, तर तुम्ही पुढील वर्गात या संकल्पनेचा सराव सुरू ठेवण्यासाठी अधिक वेळ वापरण्याचा निर्णय घेऊ शकता.
पण ज्या विद्यार्थ्यांनी संघर्ष केला आणि ज्यांना अतिरिक्त आधाराची गरज आहे त्यांचे आम्ही काय करू शकतो? चला ते आमच्या दुसऱ्या मॉडेलमध्ये शिकूया .

मॉडेल 2- रेमेडिएशन साठी खान अकॅडमी वापरा

शिक्षक या नात्याने, आम्हा सर्वांना माहित आहे की विद्यार्थी विविध स्तरांवर शिकतात. आपल्यापैकी बर्‍याच जणांना वर्गात कमीत कमी काही विद्यार्थी सापडले असतील ज्यांना पूर्वी खालच्या इयत्तांमध्ये शिकवलेल्या विषयांवर अजून काम करणे आवश्यक आहे.
या मॉडेलमध्ये, तुम्ही तुमच्या रेमेडिएशन प्लॅन नुसार सामग्री नियुक्त करण्यासाठी खान अकॅडमी वापरू शकता.
 1. तुमच्या विद्यार्थ्यांना सर्वात जास्त सराव करण्यासाठी आवश्यक असलेले पाठ तुम्ही ओळखू शकता आणि खान अकॅडमीवर संरेखित सामग्री शोधू शकता.
 2. त्यानंतर विद्यार्थ्याला ज्यावर काम करावे लागेल त्यावर आधारित तुम्ही दर 1-2 आठवड्यांनी काही संसाधने आणि सराव नियुक्त करू शकता. उदाहरणार्थ, यात पाच व्हिडिओ, दोन लेख आणि पाच सरावांचा समावेश असू शकतो. (विद्यार्थ्यांना असाइनमेंट पूर्ण करण्यासाठी आवश्यक तो कालावधी द्या. विद्यार्थ्यांनी एकतर वर्गात, शाळेच्या संगणक प्रयोगशाळेत किंवा घरी निर्दिष्ट नियत तारखेमध्ये असाइनमेंट पूर्ण करणे अपेक्षित आहे.
 3. विद्यार्थी असाइनमेंटवर काम करत असताना, ज्या कालावधीत विद्यार्थी संघर्ष करत आहेत त्या विषयांवर त्यांनी अतिरिक्त वर्ग/पुन्हा शिकवणे किंवा शंका-निवारण सत्रांसाठी अतिरिक्त वेळ द्यावा की नाही हे तपासण्यासाठी तुम्ही निरीक्षण करू शकता.
रेमेडिएशन चा अभ्यास आपल्या इयत्तेच्या अभ्यासव्यतिरिक्तचा देखील असू शकतो. शिक्षक आठवड्यातून एक दिवस विद्यार्थ्याला त्यांच्या नेमून दिलेल्या विषयांवर काम करण्यासाठी आणि त्यांच्या समजुतीतील अंतर भरून काढन्यासाठी ठरवून ठेवू शकतात.

मॉडेल 3- नवीन आणि जुन्या कौशल्यांचे मिश्रण नियुक्त करा (परीक्षेच्या काळात वापराचे मॉडेल)

संपूर्ण शैक्षणिक वर्षात बराचसा कालावधी परीक्षांचा देखील असतो. या काळात आपल्याला आपला चालू अभ्यासक्रम शिकवावा लागतो परंतु त्याच वेळी आपण शिकवलेल्या मागील विषयांवर विद्यार्थ्यांची उजळणी देखील घ्यावी लागते.
हे मॉडेल परीक्षेच्या महिन्यांमध्ये शिक्षकांसाठी सर्वात उपयुक्त ठरू शकते जिथे त्यांना अध्यापनाच्या चालू आणि अलीकडे शिकवलेल्या दोन्ही विषयांवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.

वर्गापुर्वी

परीक्षांच्या काळात तुम्हाला 30-45 मिनिटे वेळ प्लॅटफॉर्मवरील शैक्षणिक माहिती ची पाहणी करण्यास व त्यातून योग्य असे जुन्या व नव्या संकल्पनांचे मिश्रण नियुक्त करण्यास द्यावे लागतील. या नियुक्त केलेल्या माहितीचा अभ्यास करण्यासाठी तुम्ही आठवड्यातून किमान १ दिवस राखून ठेवू शकता.

वर्गादरम्यान

 • हजेरी घेतल्यानंतर किंवा वर्गाच्या सुरुवातीच्या इतर कोणत्याही प्रक्रियेनंतर, तुम्ही वर्गाला संगणक प्रयोगशाळेत नेऊ शकता किंवा खान अकॅडमीवर नियुक्त केलेल्या पुनरावलोकन विषयांचा अभ्यास करण्यासाठी विद्यार्थ्यांना उपकरणे उपलब्ध करून देऊ शकता.
 • विद्यार्थी त्यांच्या असाइनमेंट पूर्ण करण्यासाठी स्वतंत्रपणे काम करतात.
 • ज्यांना अधिक मदतीची गरज आहे अशा विद्यार्थ्यांच्या गटाला लहान-समूह सूचना देण्यात तुम्ही वेळ देऊ शकता. तुम्ही या लहान गटाला सपोर्ट करण्यासाठी आधीच सामग्रीमध्ये प्रभुत्व मिळवलेल्या विद्यार्थ्यांना देखील सांगू शकता (हे तुम्हाला कृती आढावा टॅबचे निरीक्षण करण्यासाठी देखील वेळ देईल)
 • वर्गाच्या शेवटच्या पाच मिनिटांदरम्यान, शिक्षक असाइनमेंट पूर्ण किती जणांनी केलेली आहे हे पाहतात. त्याचबरोबर विद्यार्थ्यांबरोबर त्यांनी केलेल्या प्रयन्तांचे चिंतन करतात (उदा: तुम्हाला कोणता पाठ सर्वात आव्हानात्मक वाटला आणि जेव्हा तुम्ही अडकल्यासारखे वाटले तेव्हा तुम्ही काय केले?)
 • तुम्ही देय तारीख परीक्षेच्या तारखांशी संरेखित ठेवू शकता.
विद्यार्थी शाळेत आणि घरीही सराव करत राहू शकतात.

मॉडेल 4- खान अकॅडमी चा गृहपाठ असाइनमेंट म्हणून वापर करा

या मॉडेलमध्ये, शिक्षक गृहपाठ असाइनमेंटसाठी नेहमी वापरायचा स्त्रोत म्हणून खान अकॅडमीचा वापर करतात. पारंपारिक गृहपाठ असाइनमेंटपेक्षा खान अकॅडमि वरील गृहपाठ असाइनमेंट तपासणे जलद आणि अधिक सोयीस्कर आहे. खान अकॅडमी अँपची सर्वात अलीकडील आवृत्ती डाउनलोड करून विद्यार्थी संगणकावर किंवा मोबाइल डिव्हाइसवर खान अकॅडमी गृहपाठ असाइनमेंट पूर्ण करू शकतात.
या मॉडेलमध्ये 2 प्रकार आहेत

प्रकार 1:

 1. तुम्ही वर्गात एखादा विषय शिकवू शकता आणि पाठ्यपुस्तकांतील सरावाचा सराव तुम्ही नेहमी करता त्याप्रमाणे विद्यार्थ्यांना करायला सांगू शकता.
 2. नंतर विद्यार्थ्यांना गृहपाठ असाइनमेंट म्हणून खान अकॅडमिवरील शैक्षणिक माहिती नियुक्त करा. विद्यार्थी वर्गात येण्यापूर्वी घरी असाइनमेंट पूर्ण करू शकतात आणि सरावात प्रभुत्व मिळवू शकतात.
 3. विद्यार्थ्यांनी केलेल्या प्रगतीचा आढावा खान अकॅडमि वरील अहवालांच्या माध्यमातून तुम्ही घेऊ शकता. त्यानुसार तुम्ही विषय पुन्हा शिकवू शकता किंवा प्रश्न/कौशल्यांबद्दल शंका स्पष्ट करू शकता जिथे विद्यार्थ्यांना अधिक मदतीची आवश्यकता आहे.

प्रकार 2:

 1. तुम्ही खान अकॅडमीचे व्हिडिओ आणि लेख प्रामुख्याने वर्गाच्या आधी नियुक्त करू शकता. विद्यार्थ्यांना वर्गात येण्यापूर्वी या असाइनमेंट घरी पूर्ण कराव्या लागतात.
 2. जेव्हा विद्यार्थी वर्गात प्रवेश करतात तेव्हा शिकणे अधिक आकर्षक करण्यासाठी संकल्पनेवर चर्चा करण्यासाठी विद्यार्थी तयार असतात. तुम्ही अधिक चांगली समज विकसित करण्यासाठी आणि अधिकच्या सरावासाठी वर्गातील वेळ वापरू शकता.
 3. विद्यार्थी वर्गात एकत्र प्रश्नांचा सराव करतात.
प्रकार २ ची तपशीलवार आवृत्ती खान फॉर एज्युकेटर्स - अडवान्सड कोर्स अंतर्गत तुम्ही पाहू शकता.

आमची शिफारस

 1. विद्यार्थ्यांना दर आठवड्याला किमान 30-45 मिनिटे सरावाची वेळ मिळेल याची खात्री करा.
 2. विद्यार्थ्यांची प्रगती आणि कृती आढावा नियमितपणे तपासा जेणेकरुन तुम्ही तुमच्या वर्गात सर्वोत्तम काम करणारे मॉडेल ओळखू शकाल आणि ते अंमलात आणू शकाल.
 3. तुम्ही नेहमी या धड्यावर परत येऊ शकता आणि तुमच्या वर्गात लागू करण्यासाठी काही इतर मॉडेल वापरून पाहू शकता.

संवादात सामील व्ह्यायचे आहे का?

तुम्हाला इंग्रजी समजते का? अधिक चर्चा पाहण्याकरता खान अकॅडमीच्या इंग्रजी साइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.