If you're seeing this message, it means we're having trouble loading external resources on our website.

तुम्ही जर वेब-फिल्टरच्या मागे असाल तर खात्री करा की डोमेन *.kastatic.org आणि *.kasandbox.org अनब्लॉक्ड आहे.

मुख्य साहित्य

पुनरावलोकन

पुनरावलोकन

खान अकॅडमीवर प्रारंभ करणे

शिक्षक डॅशबोर्ड आणि शिक्षक साधने समजून घेणे

या लेखात, आम्ही तुम्हाला शिक्षक डॅशबोर्ड आणि शिक्षक साधनांचा परिचय देऊ.

शिक्षक डॅशबोर्ड

  • तुमच्या शिक्षक खात्यात लॉग इन करा आणि शिक्षक डॅशबोर्डवर जाण्यासाठी तुमच्या नावावर क्लिक करा. तुमच्या स्मार्टफोनमध्ये उजवीकडील मेनूवर क्लिक करा आणि शिक्षक डॅशबोर्डमध्ये प्रवेश करण्यासाठी तुमच्या नावावर क्लिक करा.
  • डॅशबोर्डवर तुम्हाला विद्यार्थ्यांसह तुमचे सर्व वर्ग आणि खान अकादमीवर उपलब्ध असलेले सर्व अभ्यासक्रम दिसतील. अभ्यासक्रमांवर क्लिक केल्याने तुम्हाला सर्व विषयांमधील विविध प्रकारच्या सामग्रीवर नेले जाईल.
  • जेव्हा तुम्ही तुमच्या नावावर क्लिक कराल, तेव्हा तुम्हाला ड्रॉप-डाउन मेनूमध्ये सेटिंग्ज आढळतील. येथून तुम्ही तुमचे खाते तपशील व्यवस्थापित करू शकता.
  • शेवटी, सेटिंग्जच्या खालील मदत विभागात तुम्हाला विविध संसाधनांचे लिंक आणि FAQ सापडतील जे तुम्हाला कोणत्याही आव्हानावर मात करण्यास मदत करतील.

शिक्षक साधने

  • आमच्या प्लेटफॉर्मवर शिक्षकांना विविध साधने मिळतात. शिक्षक साधने विभागांतर्गत, तुम्हाला कृती आढावा , कोर्स मास्टरी, असाइनमेंट्स आणि प्रोग्रेस ट्रॅकर यांसारखी शीर्षके सापडतील. या विभागातून तुम्ही विद्यार्थ्यांना असाइनमेंट देऊ शकता, त्यांचे गुण तपासू शकता आणि दिलेल्या असाइनमेंटचे व्यवस्थापन करू शकता.
  • तुम्ही संख्या टॅबद्वारे विद्यार्थ्यांचे गुण ऍक्सेस करू शकता आणि व्यवस्थापित करा टॅबवर क्लिक करून असाइनमेंट व्यवस्थापित करू शकता. व्यवस्थापन टॅब तुम्हाला किती विद्यार्थ्यांनी असाइनमेंट पूर्ण केले आहे हे तपासण्यात मदत करते. तुम्ही देय तारीख संपादित करू शकता आणि असाइनमेंट हटवू/बदलू शकता.
  • कृती आढावा टॅब तुम्हाला प्लॅटफॉर्मवर घालवलेले एकूण शिक्षणाची मिनिटे पाहण्यास मदत करतो. कौशल्य टॅब तुम्हाला सांगतो की तुमचे विद्यार्थी वेगवेगळ्या कौशल्यांवर कसे कामगिरी करत आहेत आणि त्यांनी कोणत्या स्तरावर प्रभुत्व मिळवले आहे.
  • तुम्ही तुमच्या शिक्षक टूल्स अंतर्गत प्रोग्रेस ट्रॅकर पाहू शकता, जे तुमच्या विद्यार्थ्याच्या प्रगतीचे झटपट विहंगावलोकन देते.
  • शेवटी आमच्याकडे अभ्यासक्रम प्रभुत्व टॅब आहे. या अंतर्गत, तुम्ही तुमच्या वर्गासाठी ध्येय तयार करू शकता.

तुमचा वर्ग तयार करणे आणि विद्यार्थी जोडणे

वर्ग तयार करणे

  • शिक्षक डॅशबोर्डवर, तुम्ही निळ्या रंगात ‘नवीन वर्ग जोडा’ पाहू शकता. त्यावर क्लिक करा आणि सूचित केलेल्या चरणांचे अनुसरण करा. शेअर केलेल्या फॉरमॅटवर आधारित तुम्हाला तुमचे वर्ग-नाव टाकावे लागेल.
  • पुढे तुम्हाला जोडायचा असलेला वर्ग निवडा. तुम्ही गणितात एक खालील ग्रेड आणि प्रगत विद्यार्थ्यांसाठी पुढील ग्रेड देखील जोडली पाहिजे. तुमच्या 7 वी च्या वर्गासाठी, तुम्ही 6 व्या वर्गाचे गणित आणि 8 व्या वर्गाचे गणित देखील जोडू शकता.
  • जर तुम्ही गुगल क्लासरूम वापरत असाल तर तुम्ही गुगल क्लासरूममधून तुमच्या खात्यात तुमचा वर्ग आयात करा वर क्लिक करा.

तुमच्या वर्गात विद्यार्थ्यांना कसे जोडायचे

आता तुमचा वर्ग तयार झाला आहे. आपल्या विद्यार्थ्यांना या वर्गात जोडण्याची वेळ आली आहे. विद्यार्थी तीन प्रकारे जोडले जाऊ शकतात.
  • तुम्ही गुगल क्लासरूममधून संपूर्ण वर्ग इंपोर्ट करू शकता
  • जर विद्यार्थ्यांकडे आधीच खाती असतील तर तुम्ही त्यांच्यासोबत युनिक क्लास कोड शेअर करू शकता. जेव्हा तुम्ही प्रत्येक वर्गातील साधनांच्या खाली असलेल्या विद्यार्थी टॅबवर क्लिक करता तेव्हा वर्ग कोड आढळू शकतो.
  • जर तुमचे विद्यार्थी नवीन असतील तर तुम्हाला प्रत्येक विद्यार्थ्यासाठी स्वतंत्र खाते तयार करावे लागेल. प्लॅटफॉर्म वापरकर्तानाव (वापरकर्तानाव) आणि संकेतशब्द (पासवर्ड) बनवते. तुम्ही स्वतः पासवर्ड संपादित करून नवीन पासवर्ड तयार करू शकता.
  • एकदा तुम्ही खाती तयार केल्यानंतर, तुमच्याकडे वापरकर्तानाव आणि पासवर्ड डाउनलोड आणि सेव्ह करण्याचा पर्याय असतो. तुम्हाला फक्त CSV पर्यायावर क्लिक करावे लागेल आणि फाइल डाउनलोड करावी लागेल. फाइल सुरक्षितपणे ठेवण्याचे लक्षात ठेवा.
  • तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही विद्यार्थी जोडू शकता. वर्ग निवडा, 'विद्यार्थी' पर्यायावर क्लिक करा आणि 'नवीन विद्यार्थी जोडा' वर जा. हे इतके सोपे आहे!
आम्ही येथे आपले विचार व अभिप्राय ऐकण्यास उत्सुक आहोत!

संवादात सामील व्ह्यायचे आहे का?

तुम्हाला इंग्रजी समजते का? अधिक चर्चा पाहण्याकरता खान अकॅडमीच्या इंग्रजी साइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.