मुख्य साहित्य
Khan for Educators (For teachers in India)
कोर्स: Khan for Educators (For teachers in India) > Unit 2
Lesson 5: अतिरिक्त संसाधने आणि प्रमाणनपुढील पायऱ्या (FAQ, अभिप्राय इ.)
पुढील पायऱ्या (FAQ, अभिप्राय इ.)
अधिकची माहिती
नमस्कार शिक्षक! तुमच्या विद्यार्थ्यांसोबत खान अकॅडमी ची प्रगत सामग्री वापरण्यात तुम्ही स्वारस्य दाखवल्याबद्दल धन्यवाद. तुमचे प्रयत्न हे अभ्यासक्रमातील प्रभुत्व राबविण्याची तुमची आवड दर्शवते जेणेकरून विद्यार्थ्यांच्या समजुतीतील त्रुटी दूर होतील आणि तुमच्या वर्गातील प्रत्येक विद्यार्थी आत्मविश्वासाने पुढे जाईल.
खान अकॅडमी विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वतःच्या शिक्षणाविषयी निवडी घेण्यास सक्षम करते. तुमची भूमिका आता सूत्रधाराची आहे. तुम्हाला विद्यार्थ्यांना मदत करावी लागेल: खान अकॅडमीचा वापर करून आत्मविश्वास मिळवा, वाढीची मानसिकता विकसित करा, शिक्षण आणि जीवन यांच्यात संबंध स्थापित करा, सहकार्याने कार्य करा आणि विद्यार्थ्यांचे यश साजरे करा! विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यासाठी तुम्ही शेअर करण्यायोग्य आणि छापण्यायोग्य प्रमाणपत्र मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करू शकता. विद्यार्थी प्रमाणपत्रे
पुढे, आमचे प्लॅटफॉर्म सहजतेने वापरण्यात तुम्हाला मदत करण्यासाठी, आम्ही कोर्स मास्टरीवरील काही नेहमी विचारल्या जाणार्या प्रश्नांची उत्तरे जोडली आहेत. तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी कृपया दिलेल्या लिंकवर क्लिक करा: मास्टरी लर्निंगशी संबंधित FAQ
हा प्रगत अभ्यासक्रम संपत आला असला तरी, शिकण्याचा प्रवास सुरूच ठेवला पाहिजे. खान अकॅडमी तुमच्यासाठी आणखी काही शिकण्याच्या संधी देते. शिक्षक डॅशबोर्डवरून मदत या टॅबवर क्लिक करा. येथे तुम्हाला अतिरिक्त साहित्य मिळेल जे तुम्हाला तुमच्या विद्यार्थ्यांसोबत खान अकॅडमी वापरण्यास मदत करू शकेल.
मदत केंद्र पहा. तेथे आपणास काही लेखांच्या मालिकेसह सामान्यपणे विचारले जाणारे काही प्रश्न आणि विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांसाठी मार्गदर्शक शोधू शकता. मदत केंद्रात आपण तांत्रिक समस्येची नोंद करून आमच्या मदत केंद्राकडुन मदत प्राप्त करू शकता.
तुम्ही खान अकॅडमीच्या शिक्षक-फेसबुक ग्रुपला देखील फॉलो करू शकता.
दूरस्थ अध्यापन आणि शिक्षणाबद्दल अधिक माहितीसाठी खान अकादमीची 'प्रत्येकजण शिकत रहा' वेबसाइट पहा. विद्यार्थी, शिक्षक आणि कुटुंबांसाठी संसाधनांसाठी- इंग्रजी आणि हिंदीमध्ये उपलब्ध**.
हा कोर्स पूर्ण करण्यासाठी, कृपया येथे फीडबॅक फॉर्मवर क्लिक करा. ही शेवटची पायरी आहे आणि आता तुम्ही तुमच्या वर्गात खान अकॅडमीचा कोर्स मास्टरी वापरण्यासाठी पूर्णपणे तयार आहात. जर तुम्हाला फॉर्ममध्ये प्रवेश करण्यात काही अडचण येत असेल तर कृपया indialearns@khanacademy.org वर संपर्क साधा.
शिक्षकांसाठी खान चा प्रगत अभ्यासक्रम पूर्ण केल्याबद्दल तुमचे हार्दिक अभिनंदन. तुम्ही तुमच्या वर्गात अभ्यासक्रमात प्रभुत्व आधारित शिक्षण लागू करण्यास उत्सुक आहात याचा आम्हाला खूप आनंद आहे. आम्ही तुमचा वर्गातील अनुभव ऐकण्याची वाट पाहत आहोत आणि तुमच्या अनुभवांमधून आणखी शिकण्याची आम्हाला आशा आहे.
आपण आपल्या शिकण्याच्या प्रवासाचा असाच आनंद घेत रहा आणि नवीन शिकत राहा.
संवादात सामील व्ह्यायचे आहे का?
अद्याप कोणत्याही पोस्ट नाहीत.