मुख्य साहित्य
शिक्षकांसाठी खान (शिक्षक मेंटर्स साठी)
कोर्स: शिक्षकांसाठी खान (शिक्षक मेंटर्स साठी) > Unit 2
Lesson 2: ध्येय निश्चिती आणि प्रगतीवर देखरेखपुनरावलोकन
ध्येय निश्चिती आणि प्रगतीवर देखरेख
शिक्षकांचे कोचिंग आणि मेंटरींग
उद्देश्य आणि ध्येय
ध्येय 1: खान अकॅडमी चा वापर करण्याची संधी उपलब्ध करून देणे.
कृपया तपासा कि:
- 100% शिक्षकांनी शिक्षक खाते तयार केले आहे.
- सर्व शिक्षकांनी खान अकॅडमीवर वर्ग तयार केले आहेत.
- सर्व शिक्षकांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना आपापल्या वर्गात जोडले आहे.
- सर्व विद्यार्थ्यांनी खान अकॅडमीवर लॉग इन करून आपले अकाऊंट ऍक्टिव्हेट केले आहे.
ध्येय 2: खान अकॅडमीचा वापर सुनिश्चित करणे
- उपलब्ध माहितीचे पुनरावलोकन करा आणि ज्या शाळा किंवा शिक्षकांना आपल्या मदतीची आवश्यकता आहे त्यांना ओळखा.
- शैक्षणिक कामगिरीत सुधारणा करण्यासाठी खान अकॅडमीवर दर आठवड्याला 30 मिनिटांपेक्षा जास्त अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची टक्केवारी वाढविणे.
- सुनिश्चित करा कि हळूहळू 100% विद्यार्थी दर आठवड्याला किमान 30 मिनिटे खान अकॅडमीचा वापर करत आहेत.
प्रगतीच्या आकडेवारीचा आढावा घेणे आणि वेळेवर आढावा बैठका घेणे
ध्येय 1 संदर्भातील माहितीचे अवलोकन - खान अकॅडमी चा वापर करण्याची संधी उपलब्ध करून देणे
- शिक्षक खाते तयार करणे, नवीन वर्ग जोडणे आणि वर्गात विद्यार्थी जोडणे या प्रक्रियेस रोस्टरिंग म्हणतात.
- आपण आपल्या जिल्हा, ब्लॉक आणि शाळांची रोस्टरिंग माहिती जसे कि नोंदणी केलेल्या शिक्षकांची संख्या, शाळानिहाय जोडलेल्या वर्गांची आणि विद्यार्थ्यांची संख्या गोळा करा.
- प्रत्येक शाळेतील किती शिक्षकांनी खान अकॅडमीवर आपले खाते यशस्वीरित्या तयार केले आहेत याचा दर आठवड्याला मागोवा घ्या.
- शिक्षकांनी आपापले वर्ग त्यांच्या शिक्षक डॅशबोर्डवर तयार केले आहेत की नाही हे तपासा.
- शिक्षकांनी त्यांच्या सर्व विद्यार्थ्यांना आपापल्या वर्गात जोडले आहे की नाही हे तपासा.
ध्येय 2 संदर्भातील माहितीचे अवलोकन - खान अकॅडमीचा वापर सुनिश्चित करणे
- खान अकॅडमीच्या टीमकडून आपण आपल्या ब्लॉक किंवा जिल्ह्यातील शाळांसाठीची विद्यार्थ्यांनी केलेल्या वापराची माहिती युसेज ट्रॅकरवरून मिळवा.
- जर आपण एखाद्या खाजगी शाळेचे मेंटर असाल,कि जी खान अकॅडमीच्या राज्य भागीदारी अंतर्गत नाही, तर आपणास दर आठवड्याला हि माहिती स्वतः गोळा करणे आवश्यक आहे. आपण आपल्या शिक्षकांकडून कृती आढावा टॅबमधून माहिती मिळण्यासाठी विनंती करू शकता.
- शिक्षकांकडून विद्यार्थीनिहाय अभ्यासाचे एकूण मिनिट, कौशल्यांची वाढलेली संख्या, प्रगतीशिवाय कौशल्यांची संख्या आदींची माहिती देण्यास सांगा.
- आठवड्यातील एक दिवस निश्चित करून शिक्षकांना माहिती गोळा करण्यास सांगा.
3.आढावा बैठका यशस्वीरीत्या कशा घ्याव्यात?
- प्रत्येक बैठकीपूर्वी आपल्याकडे असलेल्या माहितीचा अभ्यास करा.
- महिन्यातून दोनदा आढावा बैठक घेऊन शिक्षक खाते, नवीन वर्ग जोडणे, विद्यार्थी खात्यांवर किंवा विद्यार्थ्यांच्या खान अकॅडमीवरच्या उपयोगाबद्दल चर्चा करा.
- प्रमाणपत्र देऊन आपले ध्येय पूर्ण केलेल्या यशस्वी शिक्षकांच्या प्रयत्नांचे कौतुक करा.
- शिक्षकांसमोरील आव्हानांवर चर्चा करून उपाय सुचवा.
ध्येय निश्चितीच्या हार्दिक शुभेच्छा! आपले अनुभव येथे सांगा.
संवादात सामील व्ह्यायचे आहे का?
अद्याप कोणत्याही पोस्ट नाहीत.