If you're seeing this message, it means we're having trouble loading external resources on our website.

तुम्ही जर वेब-फिल्टरच्या मागे असाल तर खात्री करा की डोमेन *.kastatic.org आणि *.kasandbox.org अनब्लॉक्ड आहे.

मुख्य साहित्य

पुनरावलोकन

शिक्षकांना कोचिंग आणि मेंटरींग

शिक्षकांचे कोचिंग आणि मेंटरींग

कोचिंग आणि मेंटरींगचे महत्त्व.

ट्रेनिंग मधून नवीन ज्ञान मिळते. तथापि, ज्ञानाव्यतिरिक्त, शिक्षकांना त्यांच्या दैनंदिन अध्यापन पद्धतीत बदल करण्यासाठी प्रेरणा आणि सहकार्य देखील आवश्यक आहे.
जेव्हा एखादा शिक्षक प्रथमच काहीतरी नवीन अंमलात आणण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा कदाचित ते त्यांच्या पहिल्या प्रयत्नात यशस्वी होणार नाहीत. त्यांना अंमलबजावणीत देखील मदतीची गरज भासणार आहे.
म्हणूनच कोचिंग आणि मेंटरींग, शिक्षकांना ज्ञान आणि वर्गात आवश्यक असलेल्या कृतींमधील दरी ओलांडण्यास मदत करते.

वर्ग निरीक्षण करताना लक्षात ठेवायच्या गोष्टी

 • सर्वप्रथम, शिक्षकांना आधीच कळवा की आपण त्यांच्या वर्गास भेट देऊ इच्छित आहात.
 • त्यानंतर, शिक्षकांशी सल्लामसलत करून वर्गनिरीक्षणाची तारीख आणि वेळ ठरवा.
 • शाळेत 10-15 मिनिटे लवकर पोहोचा. शिक्षकाला तुमच्यासोबत कम्फर्टेबल बनवा आणि निरीक्षणाचे उद्दिष्ट त्यांना सांगा.
 • निरीक्षणादरम्यान शेवटच्या बाकावर बसा जेणेकरून विद्यार्थी आपल्या उपस्थितीने विचलित होणार नाहीत.
 • वर्गादरम्यान शिक्षक किंवा विद्यार्थ्यांना तुमच्यामुळे अडथळा येणार नाही याची काळजी घ्या.
 • विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांच्या कृतींची सविस्तर नोंद घ्या.

निरीक्षणाचे मुद्दे

 • विद्यार्थ्यांना त्यांचा युजर आयडी, पासवर्ड आणि खान अकॅडमीवर लॉग इन कसे करावे हे माहित आहे का?
 • शिक्षकाने कोणते अंमलबजावणी मॉडेल निवडले आहे?
 • शिक्षक डॅशबोर्ड चे अवलोकन करणे, विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांचे कौतुक करणे आणि शैक्षणिक माहिती नियुक्त करण्याची नियमित सवय आणि निश्चित प्रक्रिया वर्गात आपणास दिसते आहे का?
 • सर्व विद्यार्थ्यांना खान अकॅडमीचा उपयोग करण्याची संधी मिळतेय का?
 • खान अकॅडमीवर सर्व विद्यार्थ्यांनी आठवड्यातून कमीतकमी 30 मिनिटे सराव करावा हे सुनिश्चित करण्यासाठी शिक्षक कोणती अतिरिक्त पावले उचलू शकतात?

अभिप्राय चर्चा

आपण वर्ग निरीक्षण पूर्ण केल्यानंतर, आम्ही सुचवू इच्छितो कि आपण आपल्या नोट्स वाचण्यासाठी कमीतकमी 20-30 मिनिटे घ्यावी. आपल्या निरीक्षणांवर नजर टाका आणि 3 महत्वाच्या प्रश्नांवर विचार करा.
 • शिक्षकाच्या सर्वात चांगल्या 1-2 कृती कोणत्या आहेत कि ज्याबद्दल आपण शिक्षकाचे कौतुक करू इच्छिता?
 • शिक्षकाच्या अशा 1-2 कृती कोणत्या आहेत कि ज्यात त्यांनी सुधारणा करावी?
 • वर्गाच्या निरीक्षणाच्या आधारे, आपण शिक्षकांना कोणत्या 1-2 क्षेत्रात मदत करू शकता? हि मदत त्यांना उपकरणे आणि इंटरनेट बाबत असू शकते किंवा शाळेच्या वेळापत्रकाबाबत त्यांना सहकार्य करणे किंवा पालकांची मदत मिळवण्यासंदर्भात असू शकते.

शिक्षकांना सहकार्य करण्याच्या पद्धती

1. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी पालकांची मदत घेणे
अ) आपल्या शिक्षकांना नियमित पालक बैठका घेण्यास प्रोत्साहित करा.
ब) खान अकॅडमीवर विद्यार्थ्यांचा अभ्यास घेण्यात पालकांची काय भूमिका असावी, याबाबत शिक्षकांनी त्यांच्याशी अपेक्षित कालावधीसह स्पष्ट चर्चा करावी. शिक्षकांनी पालकांना विनंती केली पाहिजे कि:
 • त्यांनी विद्यार्थ्याला आठवड्यातून २ ते ३ वेळा १० ते १५ मिनिटांसाठी मोबाईल अथवा कॉम्पुटर दिला पाहिजे
 • आणि दुसरी विनंती कि घरी विद्यार्थी खान अकॅडमीवर सराव करत असताना, पालकांनी त्यांच्यावर देखरेख ठेवावी
c) यशोगाथा आणि पालकांनी आव्हनांचा केलेला सामना यावर चर्चा करण्याची संधी उपलब्ध करून द्या.
2. शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी 'थ्री बिफोर मी' पद्धत
हि पद्धत शिक्षकांमध्ये नेतृत्वक्षमता आणि समस्या सोडविण्याचे कौशल्य विकसित करण्यासाठीचा एक प्रभावी मार्ग आहे. या पद्धतीमध्ये तुम्हाला आधी शिक्षकांचे प्रश्न ऐकून घेऊन त्यांच्या प्रश्नाचे स्वरूप समजून घ्यावे लागेल. जर प्रश्न तांत्रिक स्वरूपाचा असेल आणि तो खान अकॅडमी प्लॅटफॉर्मशी संबंधित असेल तर शिक्षकांना पुढील 3 प्रश्न विचारा.
तुम्ही 'शिक्षकांसाठी खान' हा कोर्स केला आहे का? तुमच्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही कोर्सच्या एखादी व्हिडिओत किंवा लेखात शोधण्याचा प्रयत्न केला आहे का? आमचा अभ्यासक्रम वर्गात शिक्षक खान अकॅडमीचा वापर कसा करू शकता याचे सखोल स्पष्टीकरण प्रदान करतो.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न म्हणजेच FAQ तुम्ही वाचले आहेत का? FAQ's शिक्षकांसाठी खानच्या बिगिनर कोर्समध्ये देण्यात आले आहे. हे FAQ तुम्हाला पुढील लेखात सापडतील.
खान अकॅडमी प्लॅटफॉर्मवरील 'मदत' विभाग तुम्ही तपासला आहे का? खान अकॅडमी अकाउंट लॉग इन केल्यानंतर उजव्या कोपऱ्यात तुमच्या नावावर क्लिक केल्यावर तुम्हाला हा विभाग सापडेल. हा मदत विभाग आपल्याला मदती संबंधी विषयांवर घेऊन जातो. खान अकॅडमी प्लॅटफॉर्मशी संबंधित सर्व प्रश्न येथे स्पष्ट केले आहेत.
हि पद्धत शिक्षकांमध्ये नेतृत्वक्षमता आणि समस्या सोडविण्याचे कौशल्य विकसित करण्यासाठीचा एक प्रभावी मार्ग आहे.
याव्यतिरिक्त, जर आपण खान अकॅडमीच्या भागीदार राज्यांपैकी एखाद्याचे असाल तर आपण खान अकॅडमीचा शिक्षक सहायता केंद्राचा क्रमांक देखील सामायिक करू शकता. आमच्या शिक्षक सहायता केंद्राच्या सदस्यांना या तांत्रिक प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी मदत करण्यास आनंद होईल.

संवादात सामील व्ह्यायचे आहे का?

अद्याप कोणत्याही पोस्ट नाहीत.
तुम्हाला इंग्रजी समजते का? अधिक चर्चा पाहण्याकरता खान अकॅडमीच्या इंग्रजी साइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.