If you're seeing this message, it means we're having trouble loading external resources on our website.

तुम्ही जर वेब-फिल्टरच्या मागे असाल तर खात्री करा की डोमेन *.kastatic.org आणि *.kasandbox.org अनब्लॉक्ड आहे.

मुख्य साहित्य

संसाधने (FAQs, प्रशस्तिपत्र इत्यादी)

संसाधने (FAQs, प्रशस्तिपत्र इत्यादी)

संसाधने (FAQs, प्रशस्तिपत्र इत्यादी)

नमस्कार मेंटर्स!
शिक्षकांसाठी खान - मेंटर्स कोर्स पूर्ण करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल धन्यवाद. शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी आणि आपल्या शाळा / ब्लॉक / जिल्हा / प्रदेशातील शिक्षणातील दरी कमी करण्यासाठीची आपली तळमळ आपल्या प्रयत्नांमधून प्रतिबिंबित होते.
तुमची भूमिका आता शिक्षक मेंटरची आहे. आपण शिक्षकांना मदत केली पाहिजे, त्यांना वर्गात परिवर्तनशील शैक्षणिक वातावरण तयार करण्यास सक्षम केले पाहिजे. विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी विद्यार्थ्यांचे कौतुक हा महत्त्वाचा घटक आहे. म्हणूनच, आपल्याला विद्यार्थ्यांचे कौतुक करणे सोपे करण्यासाठी आणि त्यांना त्यांच्या अभ्यासात गुंतवून ठेवण्यासाठी, आपण शेअर आणि प्रिंट करण्यायोग्य प्रमाणपत्रे देण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करू शकता. विद्यार्थी प्रमाणपत्र
याव्यतिरिक्त, आपल्याला आणि शिक्षकांना आमच्या प्लॅटफॉर्मचा सहजपणे वापर करण्यास मदत करण्यासाठी, आम्ही अभ्यासक्रमात प्रभुत्व यावर वारंवार विचारल्या जाणाऱ्या काही प्रश्नांची उत्तरे जोडली आहेत. आपल्या प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी कृपया दिलेल्या लिंकवर क्लिक करा: अभ्यासक्रमात प्रभुत्व संबंधित FAQ
हा कोर्स संपत आला असला तरी आपला शिकण्याचा प्रवास सुरूच राहायला हवा. खान अकॅडमी आपणास आणखी काही शिकण्याच्या संधी उपलब्ध करून देते. शिक्षक डॅशबोर्डवरून संसाधने टॅबवर क्लिक केल्यास आपल्याला अतिरिक्त शैक्षणिक माहिती मिळेल जी आपल्याला आपल्या विद्यार्थ्यांसह खान अकॅडमी वापरण्यास मदत करेल.
मदत केंद्र पहा. तेथे आपणास काही लेखांच्या मालिकेसह सामान्यपणे विचारले जाणारे काही प्रश्न आणि विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांसाठी मार्गदर्शक शोधू शकता. मदत केंद्रात आपण तांत्रिक समस्येची नोंद करून आमच्या मदत केंद्राकडुन मदत प्राप्त करू शकता.
दूरस्थ शिक्षण आणि अभ्यासाबाबत अधिक माहितीसाठी तसेच विद्यार्थी, शिक्षक आणि कुटुंबांसाठी इंग्रजी आणि हिंदीमध्ये उपलब्ध संसाधनांसाठी खान अकॅडमीची Keep everyone learning वेबसाइट पहा.
पुढील लेखात आपणास आपल्या कोर्सच्या प्रमाणपत्रावर दावा करण्याची प्रक्रिया आढळेल. आपल्याला फॉर्म बाबत काही अडचण असल्यास कृपया indialearns@khanacademy.org वर संपर्क साधा.

अनुभव

गेल्या काही वर्षांत, आम्ही भारतातील सर्वोतोकृष्ट मान्यताप्राप्त शाळांमधील काही सर्वोत्तम शिक्षकांसोबत मिळून काम केले आहे. हे करताना, आम्ही शिकलो की भारतीय शिक्षक त्यांच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी शिकण्याचा अनुभव वैयक्तिकृत करण्यासाठी आमच्या अध्यापन संसाधनांचा उपयोग करण्यास कसे आवडते.
आता 'शिक्षकांसाठी खान' या कोर्सच्या माध्यमातून या उत्कृष्ट शिक्षकांनी वापरलेल्या सर्वोत्तम पद्धती भारतातील प्रत्येक शिक्षकासोबत शेअर करायच्या आहेत. आमच्या शिक्षकांकडून त्यांनी खान अकॅडमीचा उपयोग त्यांच्या वर्गांसाठी कसा केला ते ऐका.
शिक्षकांसाठी खान - मेंटर्स कोर्स पूर्ण केल्याबद्दल तुमचे मनःपूर्वक अभिनंदन. आपण पुढे जात असताना आणि आपल्या शाळा / ब्लॉक / जिल्हा / प्रदेशात खान अकॅडमी कार्यान्वित करण्यास सुरवात करताना खान अकॅडमीमध्ये आम्ही उत्साहित आहोत. आम्ही आपल्या अविश्वसनीय कथा ऐकण्याची वाट पाहत आहोत आणि आपण आपल्या अनुभवांमधून अधिक शिक्षण्याची आशा करतो.
आपण आपल्या शिकण्याच्या प्रवासाचा असाच आनंद घेत रहा आणि नवीन शिकत राहा.

संवादात सामील व्ह्यायचे आहे का?

अद्याप कोणत्याही पोस्ट नाहीत.
तुम्हाला इंग्रजी समजते का? अधिक चर्चा पाहण्याकरता खान अकॅडमीच्या इंग्रजी साइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.